वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:04+5:302021-01-08T04:09:04+5:30
सिल्लोड : कोरोनाने समाजाला साध्यापणाने जगणे शिकविले आहे. शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी जोडधंद्यांकडे वळले पाहिजे. ईश्वराने दिलेल्या मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी ...

वाणिज्य वार्ता
सिल्लोड : कोरोनाने समाजाला साध्यापणाने जगणे शिकविले आहे. शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी जोडधंद्यांकडे वळले पाहिजे. ईश्वराने दिलेल्या मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी संतांच्या विचारांचे आचरण करा, संकटात सापडलेल्या इतरांना नेहमी मदत करा. आजची स्थिती पाहता समाजाला दानशूर व्यक्ती व संत विचारांची कास धरणाऱ्यांची गरज आहे, चांगले काम करायला सामोरे व्हा, असे आवाहन ह.भ.प. निवृत्ती महाराज यांनी केले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा रंगला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रथम शिवस्मारक व भीम पार्कचा माहितीपर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री सत्तार यांची विशेष उपस्थिती होती.
कोरोना काळात राज्यमंत्री सत्तार यांनी ७० हजार लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. गोरगरिबांचा आशीर्वादच माणसाला मोठे करीत असतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत ह.भ.प. निवृत्ती महाराज यांनी अब्दुल सत्तार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शेलगाव संस्थानचे ह.भ.प. दयानंद महाराज, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, अब्दुल समीर, अर्जुन पा. गाढे, नंदकिशोर सहारे, नरेंद्र (बापू) पाटील, शेख आमेर अब्दुल सत्तार, देवीदास पा. लोखंडे, किशोर अग्रवाल, रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
------------
फोटो : ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सिल्लोड येथे आयोजित कीर्तनाला उसळलेली गर्दी.