वाणिज्य वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:23+5:302020-12-17T04:28:23+5:30
१०१ जणांनी केले रक्तदान पैठण : माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांची जयंती पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या ...

वाणिज्य वार्ता
१०१ जणांनी केले रक्तदान
पैठण : माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांची जयंती पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी १०१ जणांनी रक्तदान करून शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवाजीराव काळे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेली बँक आज पैठण बाजारपेठेचा आधारस्तंभ बनली आहे. अशा शब्दात मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. तत्पूर्वी ‘शिवाजी बँक दिनदर्शिका २०२१’ चे प्रकाशन चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, व्हा. चेअरमन हरी पंडित गोसावी, संचालक रामचंद्र काळे, भाऊसाहेब औटे, शंकरराव राऊत, सतीश बलदवा, पाशा धांडे, भिकाजी आठवले, पृथ्वीराज चव्हाण, दशरथ सोनवणे, एन. व्ही. शर्मा, तनुजा सोमनाथ जाधव, ज्योती खांडेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. आय. पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, नगसेवक हस्नोदिन कट्यारे, गोपीकिशन गोर्डे, फाजल टेकडी, संभाजी गव्हाणे, राजू टेकाळे, माणिकराव खरात, यशवंत काळे, दत्तात्रय फटांंगडे, किशोर वैद्य, नरसिंग लोहिया, गणेश पवार, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, शिवाजी मगरे, मित्र वर्धन काळे, उदय काळे, धर्मराज देशमुख, मोहित जाधव, अंबादास ढवळे, रमेश पवार, अजय करकोटक, ज्ञानेश्वर उगले, याकुब पठाण, अन्सर सय्यद, बप्पासाहेब सोनवणे, विठ्ठल तळपे, कडू पठाण, राजू निवारे यांची उपस्थिती होती.
------
यांनी घेतले परिश्रम
औरंगाबाद ब्लड बँक, आणि अमृता ब्लड बँक औरंगाबाद व शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज पठाण, गणपत म्हस्के, संतोष राऊत, विजय पोषणगीर रायभान राजळे, स्वाती थोटे,जगदीश गोरडे, सुभाष काळे, दीपक शिंदे, सुधाकर शिंदे, अमोल काळे, रत्नदीप मुळे, कैलास ढेपे, कृष्णा काकडे, ईश्वर ढोकळे, कडूबाळ कोरडे, आशिष पवार, गणेश काळे, पवन काळे, दीपक आंबोरे, फोजदार जाधव, आबेद पठाण, भाऊसाहेब कणसे, मंदा मोरे आदींनी परिश्रम घेतले.
--------
फोटो :
.