वाणिज्य वार्ता - भाचीच्या लग्नात गोदान करुन जपली भारतीय संस्कृती
By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:47+5:302020-12-04T04:07:47+5:30
वैजापूर : सिंधू संस्कृतीपासून भारतीय संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये ही जगात अतिउच्च दर्जाची म्हणून ओळखली जात होती. परकियांच्या आक्रमणानंतर ...

वाणिज्य वार्ता - भाचीच्या लग्नात गोदान करुन जपली भारतीय संस्कृती
वैजापूर : सिंधू संस्कृतीपासून भारतीय संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये ही जगात अतिउच्च दर्जाची म्हणून ओळखली जात होती. परकियांच्या आक्रमणानंतर कालौघात यातील अनेक प्रथा, परंपरांमध्ये बदल झाला. मात्र, आजही अनेक भागात या परंपरा कायम असल्याचे दिसून येते. वैजापुरातही विवाहप्रसंगी मामाने भाचीला गोदान करुन जुन्या परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
सध्याचे युग जरी ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाचे असले तरी जुन्या नैतिक व सामाजिक मूल्यांच्या पालनामुळे समाजात स्थिरता टिकून आहे. वैजापूर तालुक्यातील सविता विठ्ठल आसने यांचा विवाह पालखेडचे सचिन बाळासाहेब धनाड यांच्या सोबत नुकताच पार पडला. सविता ही येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे पाटील यांची भाची आहे. औताडे यांनी जुन्या रूढी, परंपरांना उजाळा देत, सविता-सचिनला एक देशी गाय वासरासह दान केली. त्यांनी केलेल्या या जुन्या परंतु नवीन पिढीसाठी अनोेख्या असलेल्या दानाची चर्चा वैजापूर व कोपरगाव तालुक्यात सर्वत्र होत आहे. या विवाहप्रसंगी ॲड. प्रतापराव निंबाळकर, काेळपेवाडी साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ चांदगुडे, ज्ञानेश्वर जगताप, गणेश चव्हाण, बंटी मगर, संजय गायकवाड, मानक संचेती, तुषार ससाणे, कुंदाताई शिनगर, प्रकाश गायकवाड, ज्ञानेश्वर सिनगर, अशोक डुकरे, वाल्मिकी जाधव, अनिल चव्हाण, प्रभाकर पगारे, सूर्यभान पाटील जगताप, सरपंच गायकवाड, ज्ञानेश्वर औताडे, अनिल औताडे, रवींद्र भोसले, हसन सय्यद आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : वैजापूर खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साहेबराव औताडे पाटील वधू वरांना गोदान करताना.