लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

By Admin | Updated: July 10, 2014 00:56 IST2014-07-10T00:14:24+5:302014-07-10T00:56:48+5:30

परळी: वीरशैव समाजाला अल्पसंख्याक म्हणून शासनाची मान्यता मिळाली. गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती भेटाव्यात त्याकरिता लिंगायत वाणी या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा.

Come on the road to the reservation of the Lingayat community | लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू

परळी: वीरशैव समाजाला अल्पसंख्याक म्हणून शासनाची मान्यता मिळाली. गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सवलती भेटाव्यात त्याकरिता लिंगायत वाणी या समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा मिळावा. या समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे वीरशैव समाजाचे नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितले.
मंगळवारी येथील गुरुलिंग स्वामी मंदिरात पत्र परिषद व समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. वीरशैव समाजास आतापर्यंत फक्त वैयक्तिक फायद्याकरीता अनेकांनी अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याबाबत आश्वासन दिलेले आहे. वीरशैव समाजालाही प्रवाहाबाहेर फेकले जात आहे. सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन न्यायासाठी लढा देण्याची गरज असल्याचेही दत्ताप्पा ईटके यांनी सांगितले. बैठकीला विजयकुमार मेनकुदळे, सोमनाथ हालगे, बापू अफार, अ‍ॅड. दिलीप स्वामी, शिवकुमार व्यवहार, गिरीश चौधरी, रमेश सपाटे, महादेव ईटके, विकास हालगे, माणिक हालगे, दत्ता गोपनपाळे, स्वप्नील वेरुळे, शिवा महाजन, शिवा भरडे, सुशील हरगुळे, महेश निर्मळे, नरेश पिंपळे, वैजनाथ ईटके, नरहरी टेकाळे, राजेश साखरे, शिवराज साखरे, चंद्रकांत हुंडेकरी, बाबू डांगे, मन्मथ तोडकरी, प्रभाकर कुरे, शिवकुमार केदारे, सचिन स्वामी, अश्विन मोगरकर, अनिल चौंडे, रमेश गोपनपाळे, ओंकार मिरकले, कपील चौधरी, अजिंक्य शेटे, धनराज भिगोरे, शिवरुद्र बुरांडे, गजानन हालगे, शाम बुद्रे यांच्यासह कार्यकर्ते, युवक यांची बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Come on the road to the reservation of the Lingayat community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.