पाऊस घेऊन आला पोळा

By Admin | Updated: August 26, 2014 00:32 IST2014-08-26T00:32:14+5:302014-08-26T00:32:14+5:30

हिंगोली : ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ या म्हणीच्या उलट प्रचिती सोमवारी आली. आता हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता असताना रात्री साडेआठ वाजता दमदार पाऊस सुरू झाला.

Come with the rain | पाऊस घेऊन आला पोळा

पाऊस घेऊन आला पोळा


हिंगोली : ‘पोळा अन् पाऊस झाला भोळा’ या म्हणीच्या उलट प्रचिती सोमवारी आली. आता हळूहळू पाऊस कमी होण्याची शक्यता असताना रात्री साडेआठ वाजता दमदार पाऊस सुरू झाला.
गतवर्षी आजघडीला जिल्ह्यात ९०६ मिमी पाऊस झाला होता. अगदी पहिल्याच आठवड्यात नदी, नाले एक झाले होते. पावसाने कहर केला होता. यंदा उलट परिस्थिती जिल्ह्यात असल्याने पोळ्याचे बैैल धुण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीतून शेंदून पाणी काढावे लागले. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाल्याने एकदाही वाहूनी पाणी झाले नाही.
परिणामी पाणीपातळी प्रचंढ खालावल्याने मोटाराही लावता येत नाहीत. अशातच मागील पाच दिवसांपासून पाऊस हजेरी लावली तरी दमदार पावसाची प्रतिक्षा संपली नव्हती. सोमवारी पोळा सण हलक्या पावसाने साजरा होण्याची शक्यता वाटत होती; पण रात्री ९ वाजता हिंगोलीत दमदार पावसाने हजेरी लावली. पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता.
औंढ्यातही दमदार पाऊस
दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली होती. पोळा कोरडाच जाण्याची भीती असताना सात्री साडेसात वाजता दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले. पहिल्यांदाच थोड्या दमदार पावसाचा अनुभव आला.

वसमत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र रविवारी अर्धा तासाचा जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला होता. पोळ्याच्या दिवशी सोमवारीही काहीवेळ जोरदार तर काहीवेळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला. पोळाही कोरडाच जाईल, अशी भीती होती. मात्र कशीतरी रिमझिम पोळ्याचा घास गोड करणारी ठरली.

तालुकानिहाय पडलेला पाऊस व टक्केवारी (मिमी)
तालुके २० आॅगस्ट २१ २२ २३२४
हिंगोली ०.००१.२९ १.४३१.८६५.७१
कळमनुरी २.१७९.८३ ७.८३१.००४.१७
सेनगाव ०.००२.५० २१.६७१.३३८.१७
वसमत ०.००२.७१ ०.०००.००६.८६
औंढा ४.५०१०.०० ०.७५०.००१.००
सरासरी १.३३५.२७ ६.३४0.८४५.१८

Web Title: Come with the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.