अनाथ विद्यार्थ्यांसोबत आ. सतीश चव्हाण यांनी घेतला भोजनाचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:14+5:302021-02-05T04:19:14+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि.२६) बीड बायपास येथील भगवानबाबा बालिकाश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांसोबत भोजन ...

अनाथ विद्यार्थ्यांसोबत आ. सतीश चव्हाण यांनी घेतला भोजनाचा आस्वाद
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (दि.२६) बीड बायपास येथील भगवानबाबा बालिकाश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांसोबत भोजन घेत आपला वाढदिवस साजरा केला.
प्रजासत्ताकदिनी दरवर्षी आ. सतीश चव्हाण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. भारत खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने बीड बायपास येथील भगवानबाबा बालिकाश्रमातील विद्यार्थ्यांना आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते स्मार्ट एलईडी टी.व्ही.संचासह शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर आ. चव्हाण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांनी बालिकाश्रमातील विद्यार्थ्यांसोबत बसून भोजनाचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. आ. चव्हाण यांचा हा साधेपणा पाहून आश्रमातील विद्यार्थीदेखील भारावून गेले. समाजातील अनाथ मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, त्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण पाहिजे ती मदत करायला तयार असल्याचे यावेळी आ. चव्हाण यांनी सांगितले. आ. चव्हाण यांच्यामुळेच आश्रमातील विद्यार्थ्यांना सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व खुले सभागृह तयार झाल्याचे बालिकाश्रमाच्या संचालिका कविता घुगे यांनी नमूद केले.
डॉ.अविनाश येळीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी. वाय. कुलकर्णी, अभिजित देशमुख, व्ही.जी.जाधव, रोहित देशमुख, आदींची उपस्थिती होती.
प्रा.उमाकांत कोरे, प्रा.बाळासाहेब पवळ,प्रा.जयदीप चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शन-
भगवानबाबा बालिकाश्रमातील विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेताना आ. सतीश चव्हाण, अभिजित देशमुख.