प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 23:16 IST2017-03-12T23:14:51+5:302017-03-12T23:16:41+5:30

लातूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) घोळ असल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रविवारी दुपारी गांधी चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले.

Combustion of the symbolic EVM machine | प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन

प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन

लातूर : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) घोळ असल्याचा आरोप करीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने रविवारी दुपारी गांधी चौकात प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन करण्यात आले. ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावे, अशी मागणीही बसपाच्या वतीने यावेळी करण्यात आली.
ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून भाजप निवडणुका जिंकत आहे. याला निवडणूक आयोगही जबाबदारही आहे, असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या वतीने यावेळी करण्यात आला. निवडणूक आयोग आणि भाजप सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करीत बसपा कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीनचे दहन केले. यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव प्रा. व्यंकट कसबे, प्रदेश सचिव रघुनाथ बनसोडे, जयकुमार बनसोडे, प्रा. अनिल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, दत्ता क्षीरसागर, विशाल भोपणीकर, अरविंद दामवाले, सिद्धार्थ सूर्यवंशी, भोजराज खंडेराय, उदय सोनवणे, गौतम सोनवणे, दत्ता रणदिवे, विल्सन नवगिरे, रमण गायकवाड, अ‍ॅड. अनुप पात्रे, विशाल वाहुळे, निखिल उड्डाणसिंग, प्रताप किवले आदींची उपस्थिती होती.

Web Title: Combustion of the symbolic EVM machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.