पोलिसांचे रात्रभर कोंम्बीग आॅपरेशन

By Admin | Updated: November 4, 2016 00:22 IST2016-11-04T00:16:53+5:302016-11-04T00:22:11+5:30

जालना : पोलिस दलाच्या वतीने बुधवारी रात्रभर कोम्बींग आॅपरेशन राबवून कारवाई करण्यात आली.

Combig operation for police overnight | पोलिसांचे रात्रभर कोंम्बीग आॅपरेशन

पोलिसांचे रात्रभर कोंम्बीग आॅपरेशन

जालना : पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाच्या वतीने बुधवारी रात्रभर कोम्बींग आॅपरेशन राबवून एका महत्वाच्या गुन्ह्यातील पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार गोपीसिंग कलाणीसह भोकरदन नाका येथील एका हॉटेलचालकाविरूध्द कारवाई करण्यात आली.
दिलेल्या वेळेत हॉटेल, धाबे बंद करण्यात येत किंवा नाही याची पडताळणी, आणि शहरतील नियमीत गुन्हे करणारे सराईतांचा शोध घेणे आणि कदीम जालना पोलि ठाण्यात दाखल असलेल्या ३०७ गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक ज्योतिप्रियासिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि विशेष कृती दलाच्या वतीने शहरातत रात्रभर कोम्बींग आॅफरेशन राबविण्यात आले. मोतीबाग गणपती गल्ली, शनिमंदीर, टाऊनहॉल, गांधी चमन मामा चौक, सिंधीबाजार, बडीसडक, शिवाजी पुतळा, रामनगर, वाल्मीक नगर गांधीनगर मंगळबाजार, काद्राबाद, गरिबशहा बाजार मस्तगढ भोकरदन नाका, लक्कडकोड आदी ठिकाणी पथकाने पाहणी केली. यामध्ये भोकनदन नाका येथील एका हॉटेलवर पथकाने कारवाई केली. आणि एएका गुन्हात पोलिसांना हवा असलेला संशयीत गुन्हेगार गोपीसिंग कलानी कोम्बींग आॅपरेशन दरम्यान अटक केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाच अनूचीत प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून सराईत गुन्हेगार आणिह हॉटेल आणि धाबे चालकांना आपले दुकाने बंद करण्याची नियोजीत वेळ दिली आहे. परंतु काही हॉटेलचालक लपून आपली हॉटेल्स उघडी ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली. सदर काराईत विशेष कृती दलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Combig operation for police overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.