शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून निघाल्या ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:50 IST

सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला. 

औरंगाबाद : सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्याएटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला.

या बाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. राहुल पंडित यांना कामानिमित्त काही रक्कमेची आवश्यकता होती. यासाठी ते सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये गेले. मशीनमधून १० हजार रुपयाची रक्कम काढण्याची सर्व प्रक्रिया त्यांनी पार पाडताच त्यांना ५०० रुपयाच्या नोटा त्यामधून मिळाल्या. त्या मोजत असताना त्यांना त्यातील बहुसंख्य नोटांना काळा रंग लागलेला तर काही नोटा फाटलेल्या आढळून आल्या.  

बँक व एजेन्सीने केली टोलवाटोलवीपंडित यांनी सर्व नोटा तपासून पाहताच त्यातील ४ नोटांची कोपरे दोन्ही बाजूने फाटलेले दिसले, १० नोटांना काळ्या रंगाची शाई लागली होती. ३ नोटा चिटकवलेल्या होत्या तर काही नोटांवर पेनाने लिहिलेले आढळले. या बाबत त्यांनी तेथील महाराष्ट्र बँकेशी संपर्क साधला असता कॅशिअर व सहाय्यक व्यवस्थापकाने आमचा याच्याशी संबंध नाही म्हणत हातवर केले व एटीएममध्ये पैसे भरणा-या एजन्सीचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर पंडित यांनी एजन्सीशीच्या कर्मचा-यांशी संपर्क संपर्क केला असता त्यांनी आमचे काम केवळ पैसे भरण्याचे आहे तुम्ही मुख्य शाखेशी संपर्क करा असे सांगितले.

बँक व्यवस्थापकाने मागितली माफी 

पंडित हे मुख्य शाखेत गेले असता त्यांना एटीएम जेथे आहे त्या शाखेतच जाण्याचे सांगण्यात आले. येथे पंडित यांनी मुख्य व्यवस्थापकाशी संपर्क करून त्यांना सर्व माहिती दिली असता त्यांनी नोटा बदलून दिल्या. तसेचत्यांच्या कर्माचा-यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल माफीही मागितली. मात्र,बँकेत भरताना अशा नोटा बाद ठरवण्यात येतात तर एटीएममध्ये अशा नोटा कशा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

याचा तपास व्हावामला खूप महत्वाचे काम असल्याने मी रक्कम काढण्यास तेथे गेलो होतो. अशा नोटा मिळाल्याने हातात पैसे असून देखील त्याची  किंमत नसल्याने हतबल झाल्या सारख वाटत होते. मला झालेल्या मानसिक त्रासास जबाबदार कोण ? तसेच या नोटा एटीएम मध्ये कशा येतात याचा तपास व्हावा.

- राहुल पंडित

मुख्य शाखेशी संपर्क करा आमचे काम फक्त मशीनमध्ये नोटा लोड करण्याचे आहे. आम्हाला महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेतून या नोटा मिळतात व आम्ही त्या नंतर विविध एटीएममध्ये लोड करतो. यामुळे याबाबत तेथेच संपर्क साधावा. - सचिन, एजन्सी कर्मचारी 

टॅग्स :MONEYपैसाatmएटीएमbankबँकAurangabadऔरंगाबाद