‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’; सासू- सुनांची रंगणार जुगलबंदी

By Admin | Updated: December 17, 2015 00:16 IST2015-12-17T00:05:10+5:302015-12-17T00:16:42+5:30

औरंगाबाद : सासू- सुनेचे नातेच विलक्षण. त्यामध्ये अनेक पदर असतात. सासूची प्रतिमा कजाग अशी दाखविली जात असली, तरी सासू कधी आई असते, तर कधी बहिणीसारखी साथ देणारी.

'Colors' and 'Lokmat Sakhi Forum'; Mother-in-law Jungle Bandi will play | ‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’; सासू- सुनांची रंगणार जुगलबंदी

‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’; सासू- सुनांची रंगणार जुगलबंदी

औरंगाबाद : सासू- सुनेचे नातेच विलक्षण. त्यामध्ये अनेक पदर असतात. सासूची प्रतिमा कजाग अशी दाखविली जात असली, तरी सासू कधी आई असते, तर कधी बहिणीसारखी साथ देणारी. नव्या जमान्यात तर आई- मुलीसारखे नाते असणाऱ्या सासू- सुनेच्या जोड्याही पाहावयास मिळतात. याच सगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखविणारा ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘कलर्स’ प्रस्तुत ‘जोडी नं. १ : सासू-सून’ हा कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी सायं. ४ वा. लोकमत भवन येथे रंगणार आहे.
जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स आणि स्त्रियांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारा ‘लोकमत सखी मंच’ खास आपल्यासाठी ही मेजवानी घेऊन येत आहे. नात्यातील अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारा ‘जोडी नं. १ : सासू-सून’ हा कार्यक्रम म्हणजे सासू- सुनेच्या नात्यातला दुवा ठरेल.
कलर्स चॅनलवरच्या अनेक सासू- सून जोड्या सर्वपरिचित आहेत. यामधील ‘ससुराल सिमरन का’मधील सून सिमरन व सासू सुजाता या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. आपल्या कुटुंबासाठी एका सुनेने केलेला त्याग, तिचे प्रेम, तिची जबाबदारी आणि कर्तव्ये याची सुरेख सांगड यामध्ये दाखविली आहे, तर तिच्या संघर्षात तिच्या सासरचा आणि सासूचा भक्कम पाठिंबा हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा दाखविण्यात आला आहे. ‘मेरी आशिकी तुमसे है’मधील ईशानी आणि सासू अंबा यांच्या नात्यातील विविध कंगोरे, ‘बा’ आणि त्यांच्या सुनांचे नाते या मालिकेतत अतिशय ताकदीने मांडले गेले आहेत.
अशाच प्रकारच्या अनेक सासू- सून जोड्या कलर्सवर वेगवेगळ्या मालिकांमधून रसिक चाहत्यांना भेटत असतात. आता वेळ आली आहे आपल्या अवतीभोवती असलेल्या सासू- सुनेमधील नात्यांची जुगलबंदी अनुभविण्याची. विचारांची जुगलबंदी, नात्याची वीण, संसारातील तडजोड, परस्पर सामंजस्य यावर या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी राहणार असून नाट्य, मनोरंजन, मिश्कीलता, कोपरखळ्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल.
ही स्पर्धा नि:शुल्क असून, जास्तीत जास्त सासू- सुनांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ११ ते ५ या वेळेत ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रंगतदार चार फेऱ्या
स्पर्धेसाठी चार फेऱ्या असणार आहेत. पहिली फेरी परिचयाची असेल. यामध्ये सासू- सुनेस एकमेकींची ओळख करून द्यावी लागेल. दुसऱ्या टॅलेंट फे रीमध्ये सासू- सून मिळून गाणे किंवा डान्स किंवा नक्कल किंवा अभिनय काहीही सादर करू शकतात. तिसऱ्या मॅचिंग फेरीत सासू- सुनेला मॅचिंग पेहराव करायचा आहे. त्यानंतर चौथी फेरी परीक्षक फेरी असेल. यात परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सासू- सुनेला द्यावी लागतील.

Web Title: 'Colors' and 'Lokmat Sakhi Forum'; Mother-in-law Jungle Bandi will play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.