शहरात विविध रंगांच्या माध्यमातून रस्त्यावर रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:37+5:302021-02-05T04:15:37+5:30
शहरातील रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला. आता एन-१ ...

शहरात विविध रंगांच्या माध्यमातून रस्त्यावर रंगरंगोटी
शहरातील रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला. आता एन-१ येथील रहिवाशांना रस्त्यावरून चालणे तसेच सायकलिंग करण्याहेतू ‘नेबरहूड पायलट’ प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावर विविध रंगांचा वापर करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे सायकल फॉर चॅलेंज स्पर्धेस नक्कीच फायदा होणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीने नुकतेच या भागात स्ट्रीट आर्टद्वारे रंगरंगोटी केली आहे. या स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून वेगाने फिरणाऱ्या वाहनांच्या चालकांचे लक्ष वेधण्यास मदत होईल. या रस्त्यावरून वाहन हळू चालवायला हवे, अशी एकप्रकारे जाणीव त्यास हाेईल. स्मार्ट सिटीच्या टीमने आदित्य तिवारी, आदिती पुजारी, विश्वजित सिकची, आकाश चौधरी या कलाकारांच्या मदतीने रस्त्यावर रंगरंगोटी केली आहे.