भरधाव वेगातील दोन ट्रकची टक्कर
By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:39:31+5:302015-02-03T00:58:13+5:30
उस्मानाबाद : भरधाव वेगातील दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले़ हा अपघात सोमवारी सकाळी येडशी नजीकच्या रेल्वे उड्डानपुलावर घडला

भरधाव वेगातील दोन ट्रकची टक्कर
उस्मानाबाद : भरधाव वेगातील दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले़ हा अपघात सोमवारी सकाळी येडशी नजीकच्या रेल्वे उड्डानपुलावर घडला असून, उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, बेंगलेर येथून मासे ट्रक (क्ऱ एम़पी़०९-के़सी़ ७०५१) औरंगाबादच्या दिशेने जात होता़ औरंगाबादकडून सोलापूरच्या दिशेने येणारा ट्रक (क्ऱए़पी़२१- डब्ल्यू़ ३१३०) हा येडशी नजीकच्या रेल्वे उड्डान पुलाजवळ आला असता समोरून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली़ या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले आहेत़ तर औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधील मासे रस्त्यावर पडल्याने घटनास्थळावर मसेच मासे दिसत होते़ घटनेनंतर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि बाळासाहेब गावडे, येडशी दूरक्षेत्राचे सपोफौ हुंडेकरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ जखमींना उस्मानाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठवून देण्यात आले़ अपघातामुळे दोन्ही ट्रक रस्त्यावर थांबल्याने दीड-दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती़ क्रेनच्या सहाय्याने दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्या़ या प्रकरणी पोना बाळासाहेब तांबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या मालट्रक चालकाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोफौ हुंडेकरी हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)