शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांनो, १८ टक्के जीएसटी भरा; केंद्र शासनाचे विद्यापीठांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:50 IST

आठ वर्षांपासूनच्या संलग्नता शुल्कावर आकारणी

छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांना संलग्नता शुल्कावर १८ टक्के जीएसटी भरण्याचे आदेश दिले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षांपासून जीएसटी भरावी लागणार आहे. त्यामुळे ४८४ महाविद्यालयांना लाखो रुपयांचा जीएसटी विद्यापीठाकडे येत्या १० दिवसांमध्ये जमा करावा लागणार असल्याचेही परिपत्रकात म्हटले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रानुसार केंद्र शासनाने १ जुलै २०१७ पासून आजपर्यंत संलग्नता शुल्कावर विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांकडून १८ टक्के जीएसटी घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब सर्व विद्यापीठांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. महाविद्यालयांकडून जमा होणारी जीएसटीची रक्कम शासनाकडे जमा करण्यात येणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून आजपर्यंत विद्यापीठाकडे संलग्नता शुल्कासाठी भरलेल्या रकमेवर १८ टक्के जीएसटी शुल्क भरावे लागेल. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न साडेचारशेवर महाविद्यालयांकडून लाखो रुपयांची जीएसटी जमा होईल. याविषयी विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता, केंद्र शासनाने दिलेल्या आदेशाची विद्यापीठ अंमलबजावणी करीत असल्याचे सांगण्यात आले.

...तर कारवाईसह दंड होणारसलग्न महाविद्यालयांनी आठ वर्षांतील जीएसटीचे पैसे भरले नाहीत, तर संबंधितांना जीएसटी ॲक्टनुसार अतिरिक्त दंडाची कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय शासनाने विहित केलेल्या कार्यवाहीसही सामोरे जावे लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारीही संबंधित महाविद्यालय प्रशासनाची असणार आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

१० एप्रिलपर्यंत पैसे भराविद्यापीठ प्रशासनाने जीएसटीचे पैसे भरण्यासाठी महाविद्यालयांना संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. त्यानुसार १० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने रक्कम भरणा करावी आणि त्याची एक प्रत विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाकडून तपासणी करून शैक्षणिक विभागास आवश्यक त्या कागदपत्रासह विनाविलंब सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

शिक्षणाला जीएसटी कसा?महाविद्यालयाच्या संलग्नता शुल्कावर आठ वर्षांपासूनचा जीएसटी एकदाच वसूल केला जात आहे. आता विद्यार्थ्यांच्या शुल्कावरही जीएसटी लावण्याचा धोका आहे. शासनाकडून महाविद्यालयांना वेळेवर विद्यार्थ्यांच्या शुल्काचे पैसेही दिले जात नाहीत. त्यात आता जीएसटीची वसुली म्हणजे भयंकरच प्रकार आहे.- डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य, विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र