शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

युवक महोत्सवासाठी महाविद्यालयांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:58 PM

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़

भारत दाढेल ल्ल नांदेडविद्यार्थ्यांच्या कलागुणांना आविष्कृत करणाºया विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाला आयोजक मिळत नसल्याने ‘कोणीतरी युवक महोत्सव घ्या हो’, अशी विनवणी करण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे़ यावर्षी साडेतीनशे महाविद्यालयांपैकी केवळ दोनच प्रस्ताव आल्यानंतर विष्णूपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतनला यजमानपद दिल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले़स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वार्षिक युवक महोत्सव यंदा २३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे़ नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांतील महाविद्यालयीन युवकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरतो, परंतु मागील काही वर्षांपासून युवक महोत्सव घेण्यासाठी आयोजक मिळत नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे विद्यापीठाला नांदेड शहर व परिसरातील महाविद्यालयांना आयोजक करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे़ यावर्षी युवक महोत्सव घेण्यासाठी विद्यापीठाने महिनाभरापासून प्रयत्न चालविले आहेत़ महाविद्यालयांना स्मरणपत्र पाठविण्यात आले होते, परंतु महाविद्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही़ दरम्यान, मातोश्री प्रतिष्ठान व ग्रामीण तंत्रनिकेतन हे दोनच प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते़ त्यापैकी मातोश्री प्रतिष्ठानने गतवर्षी युवक महोत्सवाचे यजमानपद भूषविले होते़ त्यामुळे विष्णूपुरीतील ग्रामीण तंत्रनिकेतन या संस्थेला आयोजक म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती आहे़ २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन केले असून विद्यापीठ महोत्सवाच्या तयारीला लागले आहे़मागील काही वर्षांपासून युवक महोत्सवाला महाविद्यालयांचा प्रतिसाद मिळत नसल्याने स्पर्धकांची संख्याही कमी होत आहे़ दुसरीकडे विद्यापीठाकडून मिळणारे अनुदानही कमी असल्याने आयोजकांचा उत्साह मावळला आहे़