जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T23:53:26+5:302014-09-11T00:01:06+5:30
हिंगोली : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ६६ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
हिंगोली : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ६६ वा वर्धापन दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी संबंधित शासकीय विभागांनी नियोजनपूर्वक काम करण्याची सूचना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण पुलारी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, जिल्हा क्रीडाधिकारी किशोर पाठक, उत्पादन शुल्क अधिक्षक शेडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
कासार म्हणाले नगरपालिकेने नगर परिषद उद्यान, स्मृतीस्तंभ व परिसराची त्वरीत स्वच्छता करून घ्यावी, तसेच स्वातंत्र्य सैनिकांना समारंभाच्या ठिकाणी आणणे व परत घेवून जाण्याबाबतची व्यवस्था तहसील कार्यालयाने करावी, असे त्यांनी सांगितले. पोलीस विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा माहिती कार्यालय, शिक्षण विभाग, पालिका, जिल्हा शल्य चिकित्सक, तहसीलदार हिंगोली यांनी त्यांच्यावर सोपविली जबाबदारी परस्परांत समन्वय ठेवून व योग्य नियोजन करून पार पाडण्याची सुचना कासार यांनी केली.ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिषद उद्यानामध्ये सकाळी ९ वाजता होणार असल्याचे फुलारी म्हणाले. ( जिल्हा प्रतिनिधी)