कायगावात जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST2021-04-30T04:04:27+5:302021-04-30T04:04:27+5:30
जिल्हाधिकाऱ्यांसोबत यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, ...

कायगावात जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
जिल्हाधिकाऱ्यांसोबत यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, प्रभारी तहसीलदार सारिका शिंदे यांची उपस्थिती होती.
कोरोनाचा कंटेन्मेंट झोन बनल्याने गेल्या आठवड्यापासून कायगावला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रशासनाला कडक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर जुने कायगाव येथील चेकपोस्टची पाहणी करून वाहनांची तपासणी कडक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना यांनी चेकपोस्टच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आणि येथून जाणाऱ्या वाहनांची व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर तपासणी करण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप निरपळ, पं. स. सदस्य सुमित मुंदडा, कायगावचे सरपंच हरिश्चंद्र माळी, ग्रामसेवक सुधाकर घुले, भेंडाळा प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे, कायगावच्या समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता साळुंके आदींची उपस्थिती होती.
फोटो :
कायगाव येथे कोरोना कंटेन्मेंट झोनची पाहणी करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, जि.प.चे सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील.
280421\tarekh ahemad usuf shaikh_img-20210428-wa0036_1.jpg
कायगाव येथे कोरोना कंटेन्मेंट झोनची पाहणी करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. प्रसन्ना, जि.प.चे सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील.