जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा १,७६,६४९ बालकांना देणार डोस

By Admin | Updated: January 13, 2015 00:12 IST2015-01-13T00:09:13+5:302015-01-13T00:12:31+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना रविवारी पल्स पोलिस लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागात १ हजार १२६ तर शहरी भागामध्ये १४८ केंद्र निर्माण करण्यात आली आहे

Collectorate reviews 1,76,649 dosage to children | जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा १,७६,६४९ बालकांना देणार डोस

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा १,७६,६४९ बालकांना देणार डोस


उस्मानाबाद : जिल्ह्यातील शुन्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना रविवारी पल्स पोलिस लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागात १ हजार १२६ तर शहरी भागामध्ये १४८ केंद्र निर्माण करण्यात आली आहे. या सर्व केंद्रावर मिळून १ लाख ७६ हजार ६४९ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पहिली फेरी १८ जानेवारी रोजी राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून केंद्र निहाय नियोजन करण्यात आले आहे. एकही बालक लसीकरणाला मुकणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात मिळून १ हजार २७४ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासोबतच ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र, २०६ उपकेंद्र, ६ ग्रामीण रूग्णालये, ३ उपजिल्हा आणि जिल्हा रूग्णालय आणि आयुर्वेदिक महाविद्यालयामध्येही लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेंअंतर्गत पाच वर्षांच्या आतील सुमारे १ लाख ७६ हजार ६४९ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. या दिवशी ज्या बालकांचे लसीकरण होणार नाही, त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जावून डोस दिले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी घेतला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, टी. के. नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाबरे, ‘डीएचओ’ डॉ. आर. बी. पवार, नितीन तावडे, डॉ. स्मिता शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.

Web Title: Collectorate reviews 1,76,649 dosage to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.