जिल्हाधिकारी दालनापर्यंत पोहोचला ‘तंटामुक्ती’चा तंटा

By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T00:46:16+5:302014-08-31T01:09:48+5:30

येरोळ : गावात शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच गावातील तंटे गावातच मिटावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने गेल्या सात वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अभियान राबविण्यात येत आहे़

The collector gets a break of 'tantamukti' | जिल्हाधिकारी दालनापर्यंत पोहोचला ‘तंटामुक्ती’चा तंटा

जिल्हाधिकारी दालनापर्यंत पोहोचला ‘तंटामुक्ती’चा तंटा


येरोळ : गावात शांतता प्रस्थापित व्हावी, तसेच गावातील तंटे गावातच मिटावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने गेल्या सात वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अभियान राबविण्यात येत आहे़ परंतू, येरोळ येथे तंटामुक्त अध्यक्षाच्या निवडीवरून गोंधळ झाला हा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे़ नव्याने तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे गुरुवारी केली आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे ग्रामसभा झाली़ या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाचा विषय सुरू झाला तेव्हा सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील एका व्यक्तिची निवड केली़ दरम्यान, गावकऱ्यांनी त्यास विरोध दर्शविला़ ही निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राजकुमार सिंदाळकर, अंबीर बागवान, रविनाथ तांबोळकर यांच्यासह जवळपास ३०० नागरिकांनी केली आहे़ (वार्ताहर)

Web Title: The collector gets a break of 'tantamukti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.