वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By Admin | Updated: July 1, 2014 01:03 IST2014-07-01T00:36:39+5:302014-07-01T01:03:42+5:30
लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
लातूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेकडे हे सामुहिक राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. संघटनेनेच राजीनामे शासनाकडे पाठवावेत, असेही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास इतर राज्याप्रमाणे निश्चित करावे, केंद्राप्रमाणे उच्च वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, एनपीए ऐच्छिक असावा, समायोजनेचे प्रश्न मार्गी लावावेत, सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यात यावे, आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील ७५ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संघटनेकडे सामूहिक राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने डॉ. सगिरा पठाण, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. राम पवार, डॉ. संतोष हिंदोळे, डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. खुळे, डॉ. राहुल आणेराव, डॉ. परमेश्वर हिरास, डॉ.एस.के. शिंदे, डॉ.आर.आर. शेख, डॉ. शशिकांत डांगे, डॉ.पी.एस. कापसे, डॉ. उज्ज्वला साळुंके, डॉ. श्रीनिवास कदम, डॉ. मुशीर शेख, डॉ. नारायण देशमुख, डॉ. तांदळे, डॉ. बाळासाहेब बायस, डॉ. धीरज देशमुख, डॉ. संजय पवार आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ, जिल्हा आरोग्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सोमवारी सादर केले. यावेळी डॉ. सगिरा पठाण, डॉ. राम पवार, डॉ. सचिन बालकुंदे उपस्थित होते.