शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या रोख लाभाला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:20 IST

आखाडा बाळापूर : जि.प. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनेत वस्तूऐवजी रोख रक्कम खात्यात जमा करण्याच्या बदलाचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे.

आखाडा बाळापूर : जि.प. समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनेत वस्तूऐवजी रोख रक्कम खात्यात जमा करण्याच्या बदलाचा फटका लाभार्थ्यांना बसला आहे. वस्तू पुरवण्याऐवजी पैसे खर्च करून बिल सादर करण्याचा बदल पूर्णत: फसला आहे. जिल्ह्यात पिको मशीन व टीनपत्र्यांच्या ४८२ पैकी केवळ १३८ लाभार्थ्यांनाच लाभ मिळाला आहे. तर ४० लाखांच्या निधीपैकी १२ लाख ११७६० रुपये खर्चाविना पडून आहेत. या योजनेत टीनपत्रासाठी २० लक्ष रुपयाचा तर पिको शिलाई मशीनसाठी २० लक्ष असा एकूण ४० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. २०१६-१७ साठी पिको शिलाई मशीनसाठी १४९ लाभार्थ्यांची तर टीनपत्रासाठी ३३३ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना मशीन व टीनपत्रे हे वस्तु रुपात वाटले जायचे; परंतु ५ डिसेंबर २०१६ रोजी शासन निर्णयाप्रमाणे यातील लाभार्थ्यांना वस्तुरूपाने लाभ देण्याऐवजी रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे वस्तूरुपात लाभ देण्याऐवजी लाभार्थ्यांनी त्या वस्तू खरेदी करून त्यांचे बीले कागदपत्रांसह कार्यालयात जमा केल्यानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोखीने लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या ४८२ असली तरी प्रत्यक्षात लाभ उचलणारे केवळ १३८ लाभार्थीच ठरले. पिको शिलाई मशीनसाठी १४९ लाभार्थी पात्र ठरल्यानंतरही केवळ ५२ लाभार्थ्यांनीच लाभ उचलला. टीनपत्रासाठी ३३३ लाभार्थी पात्र ठरले पण केवळ ८६ लाभार्थीच लाभ उचलू शकले. त्यामुळे पिको शिलाई मशीनसाठीच्या २० लाख रुपयाच्या निधी पैकी ६ लाख ९५७६० रुपयेच खर्च झाले तर टीनपत्रासाठीच्या २० लाखाच्या निधीपैकी केवळ १२ लाख ११७६० रुपयेच खर्च झाले तर एकूण प्रक्रियेत २७ लाख ८८२४० एवढा मंजूर निधी खर्चाविना शिल्लक आहे. व्यक्तीगत लाभाच्या योजनेतील बदलामुळे ३४४ पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे हा बदल लाभार्थ्यांसाठी जाचक ठरला असून योजना फेल करणारा ठरला आहे.