शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत रक्तवाहिन्या आखडून वाढते ‘ब्लडप्रेशर’; गंभीर धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:13 IST

ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते.

छत्रपती संभाजीनगर : थंडीच्या दिवसांत रक्तदाब वाढू शकतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहाला अधिक दाब लागतो. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा आजार आहे, त्यांच्यासाठी ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. तापमान घटत असताना हृदयावरचा ताणही वाढतो, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

तापमानात चढ-उतारशहरातील तापमानात सतत चढ- उतार होत असताना गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. शहरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

थंडीत हाय बीपी असलेल्यांना अधिक धोकाज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, थंडीत त्यांचा बीपी आणखी वाढण्याची शक्यता जास्त असते. छातीत दडपण, चक्कर येणे अशी लक्षणे तीव्र होऊ शकतात.

गारठ्याने नसा आखडतातथंडीचा परिणाम थेट रक्तवाहिन्यांवर होतो. नसा अरुंद झाल्याने रक्तप्रवाहाला प्रतिरोध निर्माण होतो. शरीर हा प्रतिरोध ओलांडण्यासाठी अधिक दाबाने रक्त पंप करते. यालाच बीपी वाढणे म्हणतात.

हृदयापर्यंत रक्त न पोहोचल्याने धोकारक्तवाहिन्या संकुचित झाल्या तर हृदयाला ऑक्सिजनयुक्त रक्त मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे हृदयावर ताण वाढतो. यातून हृदयविकाराचा झटका येण्यासारखा धोका वाढतो.

हातापायाची बोटेही होतात कडकथंडीमुळे शरीर सर्वात आधी हात-पायांमध्ये रक्तपुरवठा कमी करते. त्यामुळे बोटे थंड पडणे, कडक होणे, मुंग्या येणे अशी लक्षणे दिसून येतात. रक्तदाब अनियंत्रित असेल तर ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात.

नेमके कशामुळे असे होते?तापमान कमी झाल्यावर शरीराची ऊब राखण्यासाठी नसा आकुंचन पावतात. हृदयाला अधिक दाबाने रक्त पंप करावे लागते. ज्यांच्यात मिठाचे प्रमाण जास्त किंवा वजन वाढलेले आहे, त्यांच्यात बीपी आणखी वाढतो. शारीरिक हालचाली कमी झाल्यानेही बीपी वाढू शकतो

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे?सकाळी थंडीत बाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावेत. गरम पाणी पिणे, वाफ घेणे, शरीराला कोमट ठेवणे. मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. रोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करावा. ध्यान, श्वसन व्यायाम करावे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. अचानक तापमान बदलापासून (थंडातून गरम/गरमातून थंडी) टाळावे.

रक्त घट्ट होतेथंडीमध्ये डिहायड्रेशन होऊन रक्त घट्ट होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. यातूनच हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.- डाॅ. केदार रोपळेकर, हृदयरोगतज्ज्ञ

उबदार कपडे, रूम वाॅर्मर वापरावाढलेली थंडी वृद्ध व्यक्ती, हृदयविकार, पक्षाघाताच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. उबदार कपडे, रूम वाॅर्मरचा वापर करावा. काही त्रास जाणवल्यास वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.- डाॅ. गणेश सपकाळ, हृदयरोगतज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Cold Weather Raises Blood Pressure: Prevention Tips for Heart Health

Web Summary : Cold constricts blood vessels, raising blood pressure, especially for those with hypertension. Keep warm, limit salt, exercise, and stay hydrated to avoid complications like heart attacks and strokes. Consult a doctor if symptoms worsen.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य