छत्रपती संभाजीनगर: शहरात ९ नोव्हेंबरपासून गारवा वाढत असून किमान तापमान दररोज घसरत आहे. सकाळपासून थंडी जाणवत आहे. मंगळवारी दिवसभरात किमान तापमान १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान २७.७ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळच्या थंड वाऱ्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागली असून, सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी उबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे.
दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी कमी दिसत आहे. सकाळच्या शाळा व महाविद्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी थंडीपासून बचावासाठी जॅकेट, मफलर वापरायला सुरुवात केली आहे.
९ दिवसांत घसरले तापमान....नोव्हेंबरमध्ये किमान तापमान घसरण्याचा यंदा रेकॉर्ड झाला आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ३२ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला ३०.४ कमाल तर १२.८ किमान तापमान नोंदविले गेले. ९ दिवसांत किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घसरले. परिणामी थंडीचा जोर वाढला आहे.
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar shivers as temperature plummets to 10.6°C. The city experiences its coldest day this season, with residents bundling up in warm clothes due to the chilly weather and cold winds.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तापमान 10.6 डिग्री सेल्सियस तक गिरने से ठंड बढ़ी। शहर इस मौसम का सबसे ठंडा दिन अनुभव कर रहा है, सर्द मौसम और ठंडी हवाओं के कारण निवासी गर्म कपड़े पहन रहे हैं।