चार दिवसांपासून थंडीचा जोर
By Admin | Updated: December 25, 2016 23:46 IST2016-12-25T23:42:55+5:302016-12-25T23:46:33+5:30
लातूर : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे़

चार दिवसांपासून थंडीचा जोर
लातूर : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे़ परिमामी, पहाटेच्या वेळी रस्त्यांवर शुकशुुकाट दिसून येत आहे़ हरभरा व गहू या पिकासाठी थंडी पोषक असली तरी ज्वारीच्या पिकांना मात्र धोका निर्माण झाला आहे़ लातूरचे तापमान १३ अंश सेल्सिअस पर्यंत आले असून, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी भागात ६़५ तापमान झाले आहे़
लातूर जिल्ह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे़ परिणामी, पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे़ ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती असून रात्री व सकाळच्या वेळी शेकोट्या पेटविल्या जात आहे़ नदी, नाले व लघू, मध्यम प्रकल्पाशेजारी असलेल्या गावांना थंडीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात थंडीचा कडाका कायम आहे़