थंडीचे रेकॉर्ड ब्रेक; तापमान ८ अंश

By Admin | Updated: December 27, 2015 00:26 IST2015-12-27T00:11:40+5:302015-12-27T00:26:09+5:30

औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे.

Cold break break; Temperature is 8 degrees | थंडीचे रेकॉर्ड ब्रेक; तापमान ८ अंश

थंडीचे रेकॉर्ड ब्रेक; तापमान ८ अंश


औरंगाबाद : उत्तर भारताच्या थंडीचा प्रकोप मराठवाड्यावरही होत असून, मागील आठ दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घसरण सुरू आहे. शनिवारी रात्री औरंगाबादचे तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले. या तापमानाने मागील नऊ वर्षांचे रेकॉर्ड मोडले. २००५ मध्ये २६ डिसेंबर रोजी औरंगाबादचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस होते. थंडी हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांना अक्षरश: हुडहुडी भरत आहे.
दिवाळीनंतर थंडी वाढते असे नेहमी बुजुर्ग मंडळी सांगत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्रही बिघडत चालले आहे. यंदा थंडीचे उशिराने आगमन झाले. डिसेंबरअखेर थंडीचा प्रकोप असह्य होऊ लागला आहे. औरंगाबादचे किमान तापमान चार दिवसांपूर्वी १३ अंश सेल्सियसपर्यंत होते. शुक्रवारी तापमान थेट ९ अंशांवर आले, शनिवारी तर थंडीने कहरच केला. तापमान थेट ८ अंशांवर उतरले. तापमानातील ही घसरण आणखी वाढू शकते असा अंदाज हवामान विभागाचा आहे.


नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. एरवी कधीही व्यायाम न करणारेदेखील थंडीच्या काळात शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. कडाक्याची थंडी पडल्याने जॉगिंग, योगा, व्यायाम यामध्येही नागरिकांचा खंड पडत आहे.

२६ डिसेंबर रोजीचे रेकॉर्ड
वर्षेकमाल किमान तापमान
२००५२६०७ अंश
२००६२८१२
२००७३२१६
२००८३०११
२००९२७०९
२०१०२८११
२०११३०११
२०१२२८०९
२०१३२७१४
२०१४२६१३
२०१५२६०८
नीचांकी तापमानामुळे शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण शेकोटीचाही आधार घेत आहेत. थंडीमुळे सायंकाळनंतर शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील वर्दळीवरही परिणाम दिसून येत आहे. हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते.

Web Title: Cold break break; Temperature is 8 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.