आचारसंहिता पथकाने १ लाख रोकड पकडली

By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:27:13+5:302014-10-02T00:36:53+5:30

लातूर : लातूर शहरातील नांदेड नाका येथे आचारसंहिता पथकाने बुधवारी जवळपास ५७ वाहनांची तपासणी केली. सकाळी एका इंडिका कारमधून निघालेल्या व्यक्तीकडे १ लाख रुपये

Code of Conduct caught 1 lakh cash | आचारसंहिता पथकाने १ लाख रोकड पकडली

आचारसंहिता पथकाने १ लाख रोकड पकडली


लातूर : लातूर शहरातील नांदेड नाका येथे आचारसंहिता पथकाने बुधवारी जवळपास ५७ वाहनांची तपासणी केली. सकाळी एका इंडिका कारमधून निघालेल्या व्यक्तीकडे १ लाख रुपये आढळून आल्याने पोलिसांनी कारसह ‘त्या’ व्यक्तीला ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी घडली.
वाहनांची तपासणी सुरू असताना एमएच २४-९९५९ या इंडिका कारमधून पांडुरंग वैजनाथ घटकार हे १ लाख ६ हजार २७० रुपये पांढऱ्या पिशवीत घेऊन जात असताना पथकाला आढळून आले. यावेळी पथकाने पांडुरंग घटकार यांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेली ती रक्कम पोलिसांनी ताब्यात घेऊन कारही पोलिस ठाण्यात लावली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. याबाबत पी.एस.आय़ कवडे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Code of Conduct caught 1 lakh cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.