आचारसंहिता भंगाचा सीएस बोल्डेंवर गुन्हा
By Admin | Updated: May 9, 2014 00:18 IST2014-05-09T00:17:39+5:302014-05-09T00:18:57+5:30
बीड: लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांनी रक्तपेढी विभागातील आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद भरले होते.

आचारसंहिता भंगाचा सीएस बोल्डेंवर गुन्हा
बीड: लोकसभा निवडणूक आचारसंहितेदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांनी रक्तपेढी विभागातील आरोग्य जनसंपर्क अधिकार्याचे पद भरले होते. ‘लोकमत’ने त्याचा भांडाफोड केला होता. याप्रकरणात बुधवारी रात्री उशिरा सीएस डॉ. अशोक बोल्डेंवर गुन्हा नोंद झाला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाने जिल्ह्यात ५ मार्च पासून आदशर् आचारसंहिता लागू केली होती़ या कालावधीत कोणत्याही शासकीय कार्यालयात पद भरती करता येत नाही असा नियम आहे. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागातील जनसंपर्क अधिकार्याच्या पदावर एकाची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली़ संबंधित व्यक्तीला बोल्डे यांनी २४ मार्च रोजी नियुक्ती पत्र दिले व रुजू करुन घेतले़ ‘आचार संहितेत पदभरती’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फुटली होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी डॉ. बोल्डे यांच्याकडून खुलासा मागविला होता़ त्यांनतर बोल्डे यांनी आचारसंहिता भंग केले असल्याचे मान्य केले होते़ जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी व्ही़बी़ निलावाड यांनी बुधवारी रात्री शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान बेकायदेशीर पदभरतीचे प्रकरण सीएस डॉ. अशोक बोल्डे यांच्यावर शेकले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)