भाजपला डावलून सेनेने फोडला नारळ
By Admin | Updated: June 2, 2015 00:33 IST2015-06-02T00:33:42+5:302015-06-02T00:33:42+5:30
औरंगाबाद : महानगरपालिकेतील शिवसेना- भाजप युतीमधील बेबनाव सोमवारी पुन्हा समोर आला.

भाजपला डावलून सेनेने फोडला नारळ
औरंगाबाद : महानगरपालिकेतील शिवसेना- भाजप युतीमधील बेबनाव सोमवारी पुन्हा समोर आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भाजपला अंधारात ठेवून शहरातील पाईपलाईन बदलण्याच्या कामाचे नारळ फोडून उद्घाटन केले. विशेष म्हणजे भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला या कार्यक्रमासाठी बोलावले गेले नाही. अगदी उपमहापौरही या कार्यक्रमाविषयी अनभिज्ञ राहिले.
समांतर जलवाहिनी योजनेंतर्गत
सेना आणि भाजप पालिकेत सोबत सत्तेत आहेत. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायला हवे होते; परंतु आम्हाला कल्पनाही दिली नाही.
- प्रमोद राठोड, उपमहापौर
४कंपनीने पाईप पाहण्यासाठी बोलावले होते. तेथे गेल्यावर त्यांनी नारळ फोडून पूजा करायला लावली. हे सर्व अचानक झाले. शिवाय हे उद्घाटन नव्हते. तर ती पूजा होती. त्यामुळे भाजपला डावलले हे म्हणणे चुकीचे आहे.
- चंद्रकांत खैरे, खासदार