वन्यजीव सप्ताहात सर्पमित्राला कोब्राचा दंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:12 IST2017-10-08T00:12:30+5:302017-10-08T00:12:30+5:30
साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली

वन्यजीव सप्ताहात सर्पमित्राला कोब्राचा दंश
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवीत असतानाच एका कोब्रा जातीच्या नागाने सर्पमित्र असलेल्या डॉ. किशोर पाठक यांना दंश केल्याची खळबळजनक घटना शनिवारी वनविभागाच्या कार्यालयातच घडली. डॉ. पाठक यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
शनिवारी वन्यजीव सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम उस्मानपुरा येथील वनविभागाच्या कार्यालयात चालू होता. यावेळी डॉ. पाठक हे वनअधिकारी व कर्मचा-यांना साप पकडण्याचे प्रात्यक्षिक दाखवित होते. सर्पमित्राने दोन दिवसांपूर्वी पकडून आणलेला कोब्रा नाग डॉ. पाठक यांनी प्रात्यक्षिकासाठी निवडला. साप कसा पकडावा व काय खबरदारी घ्यावी, यावर कर्मचाºयांंना मार्गदर्शन सुरू होते. सापाला काठीच्या मदतीने अनेकवेळा पकडण्यात आले होते. त्यामुळे साप काहीसा चवताळला होता. डॉ. पाठक हे सापाचे तोंड पकडण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नात सापाने त्यांच्या डाव्या हाताला दंश केला.