युतीचे सरकार हवामान खात्यासारखे

By Admin | Updated: July 3, 2016 00:43 IST2016-07-03T00:36:14+5:302016-07-03T00:43:02+5:30

औरंगाबाद : राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे. हवामान खाते जसे सांगते एक आणि घडते दुसरेच.

The coalition government is like the weather department | युतीचे सरकार हवामान खात्यासारखे

युतीचे सरकार हवामान खात्यासारखे

औरंगाबाद : राज्यातील भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे. हवामान खाते जसे सांगते एक आणि घडते दुसरेच. तशीच या सरकारची परिस्थिती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे युती सरकारची खिल्ली उडविली.
जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी खा. चव्हाण येथे आले होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, हवामान खाते जे सांगते ते घडत नाही. तसेच या सरकारच्याही निव्वळ घोषणा आहेत.

Web Title: The coalition government is like the weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.