सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पडद्याआड धामधूम

By Admin | Updated: November 23, 2014 00:22 IST2014-11-22T23:47:49+5:302014-11-23T00:22:38+5:30

गजानन वानखडे , जालना जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांसह गृहनिर्माण, पाणी वाटप व उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सहकार खात्याने जाहीर

Co-operative Organizations' Elections | सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पडद्याआड धामधूम

सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पडद्याआड धामधूम


गजानन वानखडे , जालना
जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांसह गृहनिर्माण, पाणी वाटप व उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सहकार खात्याने जाहीर केल्यापाठोपाठ त्या निवडणुकांना उधाण आले खरे; परंतु, पडद्याआड फारसा गाजावाजाविना या निवडणुकांचा सोपस्कार पार पाडल्या जात आहे.
सहकारी विभागाने दिलेल्या आदेशांप्रमाणे ३० नोव्हेंबरपूर्वी या सर्व ड वर्गातील २६८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
या जिल्ह्यातील सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. १ नोव्हेंबरपासून या सोसायट्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सहकार खात्याने अ,ब, क, ड असे वर्गीकरण करून पहिल्या टप्यातील ड वर्गात मोडणाऱ्या सहकारी संस्थेच्या निवडणुकेच्या प्रक्रियेला १ नोव्हेंबर पासून सुरवात केली. प्रत्यक्षात १९ नोंव्हेबरला निवडणुकीला प्रारंभ झाला. शासनाच्या आदेशाप्रमाणे ११ सप्टेबरपासून जिल्हातील सोयाट्यांचे टप्याटप्यांने निवडणुका घेण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे पहिल्यांदा ड वर्गात मोडणाऱ्या सोसायट्यांच्या निवडणुका होत आहे. ह्या निवडणुका ३० नोंव्हेबर आधी पूर्ण करून राहिलेल्या वर्गाची निवडणुक घेण्यात होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक खरात यांनी दिली. ड वर्गात मोडणाऱ्या संस्थेचे प्रकार ज्या सोसायट्यांचे सभासद संख्या दोनशेपेक्षा कमी आहे, अशी गृहनिर्माण संस्था , दोनशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी उपसा जलसिंचन आणि सहकारी पाणी वापर संस्था, सर्व मजूर / जंगल कामगार सहकारी संस्था व इतर सर्व साधारण सहकारी संस्था ह्या ड वर्गात मोडत असून सध्या याची निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीत सर्वच सभासदांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची सर्व सभासदांनी खात्री करून घ्यावी आणि आपले नाव असल्यास सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. ज्या सभासदाकडे मागील थकबाकी आहे त्यांनी तात्काळ भरावे अन्यथा मतदानाच्या यादीतील आपले नाव कमी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक खरात यांनी दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यात या निवडणुकांच्या हालचाली सुरु असल्या तरी त्याचा फारसा गाजावाजा होत नसल्याने निवडणुका होताहेत की नाही, हेच कळेनासे झाले आहे. या निवडणुकांमध्ये निव्वळ फार्स ठरतो आहे.
जालना तालुक्यातील एकूण १०५ मजूर, गृहनिर्माण, पाणीवापर व उपसा जलसिंचन सोसायट्यांच्या या कार्यक्रमानुसार निवडणुका होत आहेत.
४बदनापूर तालुक्यातील २७ सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तर अंबड तालुक्यातील २२ संस्थांच्या निवडणुका होत आहेत. घनसावंगीतील ८ मजूर संस्था तर परतूरमधील १९ संस्था, मंठा तालुक्यातील ७, जाफ्राबाद तालुक्यातील २७ व भोकरदन तालुक्यातील जवळपास ३० सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत.
जिल्ह्यातील ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या संस्थांच्या निवडणुकीसाठी काही सेवानिवृत्त कर्मचारी, व्यवस्थापक तसेच वकीलांसह गटसचिव वगैरेंच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली या निवडणुका सुरळीत व्हाव्यात म्हणून सहकार खात्याने प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे एका-एका व्यक्तिकडे किमान डझनभर सोसायट्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Web Title: Co-operative Organizations' Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.