२० हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:53+5:302021-02-05T04:19:53+5:30
वाल्मीक माधवराव काळे (५६) असे लाचखोर सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मत्स व्यवसाय सहकारी संस्थेविरुद्ध आरोपी काळे यांच्या ...

२० हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी पकडला
वाल्मीक माधवराव काळे (५६) असे लाचखोर सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मत्स व्यवसाय सहकारी संस्थेविरुद्ध आरोपी काळे यांच्या मत्स आणि दुग्धविकास कार्यालयास अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार काळे हे संस्थेची चौकशी करत होते. तक्रारदार यांनी त्यांची भेट घेतली असता काळे यांनी संस्थेवर कारवाई न करणे आणि प्रशासक न नेमण्यासाठी तसेच तक्रारदार यांच्या मनासारखा अहवाल देण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी काळेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक बी.व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत, कर्मचारी अरुण उगले, दिगंबर पाठक आणि प्रकाश घुगरे यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यानंतर आज दुपारी काळेला पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २० हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी काळेला पकडले. याविषयी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.