को-गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:02 AM2021-01-18T04:02:11+5:302021-01-18T04:02:11+5:30

प्रतिक्रिया समितीच्या सूचनेला अधिकारप्राप्त व्हावेत ‘को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन’मध्ये टेक्निकल तज्ज्ञांचा समावेश असावा. शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी जेव्हा ही तज्ज्ञ ...

Co-governmental organization | को-गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन

को-गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन

googlenewsNext

प्रतिक्रिया

समितीच्या सूचनेला अधिकारप्राप्त व्हावेत

‘को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन’मध्ये टेक्निकल तज्ज्ञांचा समावेश असावा. शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी जेव्हा ही तज्ज्ञ मंडळी आपला अमूल्य वेळ देतील. तेव्हा त्यांच्या वेळेचा व मार्गदर्शनाचा सदुपयोग प्रशासनाला करून घेता आला पाहिजे. तज्ज्ञ समिती नुसती कागदी नसावी, तर तिच्या मार्गदर्शक सूचनांना महत्त्वप्राप्त व्हावे यासाठी सरकारने अद्यादेश काढून समिती बनवावी. जेणे करून तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या सूचनांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजवणी केली पाहिजे. शहरातील आर्किटेक्ट संघटनेने असा प्रयत्न केला होता; पण त्यास तेव्हा प्रशासनाची अपेक्षित साथ लाभली नव्हती. उदा. शहरात एखादा प्रकल्प उभारायचा आहे, तर तो बजेट ठरविण्यापासूनच्या कामात प्रशासनाने ‘को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन’ला सहभागी करून घेतले तर गुणवत्तापूर्ण विकासकामे होतील.

आर्किटेक्ट सुनील देशपांडे

माजी अध्यक्ष आर्किटेक्ट संघटना

Web Title: Co-governmental organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.