‘सीएमआयए’ने घेतला कुशल कामगार निर्मितीचा वसा

By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:34+5:302020-11-28T04:07:34+5:30

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये उद्योगांतील हजारो कुशल कामगार गावी गेले. त्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ...

The CMIA took on the fat of creating skilled workers | ‘सीएमआयए’ने घेतला कुशल कामगार निर्मितीचा वसा

‘सीएमआयए’ने घेतला कुशल कामगार निर्मितीचा वसा

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये उद्योगांतील हजारो कुशल कामगार गावी गेले. त्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे ‘सीएमआयए’ने विविध उद्योगांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण देऊन ‘ऑन दि जॉब ट्रेनिंग’च्या माध्यमातून कुशल कामगार तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (सीएमआयए) ही औरंगाबाद येथील शिखर औद्योगिक संघटना गेल्या ५१ वर्षांपासून विभागातील औद्योगिकरणाला चालना देत आहे. तसेच नवीन उद्योग, नवीन गुंतवणूक आकर्षित व्हावी, यासाठी सतत्याने प्रयत्नशील आहे. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक सुक्ष्म-मध्यम-लघु उद्योगांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.

‘सीएमआयए’ने अशा उद्योगांना आपले उत्पादन कोव्हीड-१९ ची नियमावली पाळून व योग्य ती खबरदारी घेऊन सुरळीतपणे पुन्हा सुरू करण्यासाठी एमआयडीसी तसेच जिल्हा प्रशासनाकडे समन्वयाने मदत केली.

लॉकडाऊन दरम्यान उद्योग घटकांना वाढीव वीज बिलाच्या समस्येला सामोरे जावे लागले; परंतु ‘सीएमआयए’तर्फे राज्य वीज नियामक आयोगाकडे न्याय मागितला. दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या निकालामुळे उद्योग घटकांना दिलासा मिळाला.

लॉकडाऊन कालावधीत अनेक उद्योगांमधील कामगारांना त्यांच्या राज्यात स्थलांतर करावे लागले. त्यामुळे उद्योगांमध्ये कुशल तसेच अकुशल कामगारांचा तुटवडा निर्माण झाला. कामगारांची गरज लक्षात घेऊन ‘सीएमआयए’च्या

मराठवाडा ‘स्किल हब’ अंतर्गत अकुशल कामगारांना ‘ऑन दि जॉब ट्रेनिंग’च्या माध्यमातून विविध उद्योगांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामुळे उपलब्ध मनुष्यबळातून उद्योग घटक आपापले उत्पादन सुरळीतपणे करू शकतील अथवा त्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.

चौकट.....

मराठवाडा ‘स्किल्स हब’चा उपक्रम

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनांचा प्रसार करण्यासाठी ‘सीएमआयए’च्या मराठवाडा ‘स्किल्स हब’द्वारे सीएनसी प्रोग्रामर कम मशीन ऑपरेटर, मशीन ऑपरेटर प्लास्टीक प्रोसेसिंग, ऑपरेटर रोलिंग मिल इक्विपमेंट, पीसीबी असेम्ब्ली ऑपरेटर आदी कौशल्याधिष्टीत कोर्सेस राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योग घटकांनी ‘सीएमआयए’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन या संघटनेचे मानद सचिव सतीश लोणीकर यांनी केले आहे.

Web Title: The CMIA took on the fat of creating skilled workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.