शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री करणार ध्वजारोहण, इतर जिल्ह्यात कोणते मंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:32 IST

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवास सुरुवात; १७ सप्टेंबरच्या ध्वजारोहणासाठी मंत्री ठरले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त विभागात १७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर मुख्यालय येथील ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. 

तर जालना येथे पणनमंत्री अब्दुल सत्तार, नांदेड येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बीड जिल्ह्यात कृषिमंत्री धनंजय मुंडे, लातूर येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे, परभणीत गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे हे हिंगोली जिल्ह्यात, तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे धाराशिवमध्ये ध्वजारोहण करतील.

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवास आजपासून सुरुवातडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेतर्फे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ व १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे उद्घाटन होईल. यानंतर डॉ. रश्मी बोरीकर यांचे ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्त्रियांचे योगदान’ यावर बीजभाषण होईल. दुसऱ्या सत्रात विद्यापीठ विद्या परिषद सदस्य प्रा. डाॅ. व्यंकटेश लांब, विवेक भोसले यांचे व्याख्यान होईल. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. डॉ. बा.आं. म. विद्यापीठातील एचआरडीसी सभागृहात प्रा. डाॅ. उमेश बगाडे, अनिल पहाडे यांचे व्याख्यान होईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. गीतांजली बोराडे, डाॅ. मंगला बोरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा समारोप होईल.

राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ १५ सप्टेंबर रोजी तापडिया नाट्यमंदिरमध्ये दुपारी चार वाजता होईल. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री संदीपान भुमरे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह सर्व आमदार, सनदी अधिकाऱ्यांची उपस्थिती असेल.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे