शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्यासाठी कट्टीबद्ध
By Admin | Updated: August 15, 2014 00:06 IST2014-08-14T23:56:26+5:302014-08-15T00:06:09+5:30
नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्याच्याबाबतीत नेहमीच कटीबद्ध राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्यासाठी कट्टीबद्ध
नांदेड : शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना आखण्याच्याबाबतीत नेहमीच कटीबद्ध राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़ मुदखेड तालुक्यातील बोरगाव येथील सीता नदीवरील साखळी सिमेंट नाला बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळ्यात गुरूवारी ते बोलत होते़
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या लघुसिंचन-जलसंधारणांतर्गत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील ६७ साखळी बंधाऱ्यांचे लोकार्पण एकाच दिवशी करण्यात आले़ त्याचा मुख्य समारंभ बोरगाव येथे झाला़ पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले़ अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खा़ चव्हाण हे होते़ ते म्हणाले, बंधाऱ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे़ भोकर मतदारसंघात जवळपास २५ कोटी रूपयांचे बंधारे मंजूर करून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले़ पाण्यामुळे आता प्रादेशिक वाद होवू लागले आहेत़ ते टाळण्यासाठी कृषी क्षेत्रात सुक्ष्म सिचंनाच्या ठिबक योजनेचा वापर वाढवावा़ राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्वच तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे़ शासनाने नेहमीच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे़ टंचाई परिस्थिती जाहीर केल्याने त्यातून मिळणाऱ्या सवलती आणि सुविधांबाबत प्रशासनाने लक्ष घालावे अशी सूचनाही खा़ चव्हाण यांनी केली़
पालकमंत्री सावंत म्हणाले, टंचाई परिस्थिती घोषीत केल्यामुळे शेतकऱ्यांना वीजबिलात, शेतसारा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि कृषी संजीवनी योजनेतून सवलती दिल्या जातील़ लोकार्पण होत असलेली बंधाऱ्यांची योजना महत्वपूर्ण असल्याचे सांगताना जिल्हा वार्षिक योजनेतूनही सूक्ष्मसिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले़
कार्यक्रमास मुदखेड पं़ स़ च्या सभापती शोभाताई मुंगल, उपसभापती सुनील देशमुख, जि़ प़ सदस्य प्रतिभा देशमुख, रोहिदास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एम़ आऱ उप्पलवाड, बाळासाहेब देशमुख, गोविंदराव शिंदे, कुसूमबाई बंडे, गणपतराव तिडके, उपविभागीय अधिकारी केशव नेटके आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)