टिळकपथवरील कापड दुकान फोडले
By Admin | Updated: August 26, 2014 01:52 IST2014-08-26T01:22:08+5:302014-08-26T01:52:48+5:30
औरंगाबाद : टिळकपथवरील दुल्हा दुल्हन हे कापड दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

टिळकपथवरील कापड दुकान फोडले
औरंगाबाद : टिळकपथवरील दुल्हा दुल्हन हे कापड दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
काल रात्री दुकान नित्याप्रमाणे दहा वाजेच्या सुमारास बंद करण्यात आले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या छोट्याशा खिडकीतून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले काऊंटर फोडले आणि त्यात असलेली सुमारे अडीच लाखांची रोख रक्कम व देव-देवतांच्या चांदी, सोन्याच्या मूर्ती, शिक्के, असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला.
आज सकाळी नित्याप्रमाणे दुकान उघडण्यात आले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.