सराफांनी पाळला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:47 IST2017-09-14T00:47:10+5:302017-09-14T00:47:10+5:30
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचा हिंगोली येथील सराफ-सुवर्णकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून आज बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाभर सराफी व्यापाºयांनी यात सहभाग नोंदविल्याचे सांगण्यात आले

सराफांनी पाळला बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सोनार समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचा हिंगोली येथील सराफ-सुवर्णकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करून आज बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाभर सराफी व्यापाºयांनी यात सहभाग नोंदविल्याचे सांगण्यात आले.
सोनार समाजातील अल्पवयीन मुलीच्या मारेकºयांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी संघटनेच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. त्याला हिंगोलीत कडककडीत बंद पाळून प्रतिसाद मिळाला. सेनगावातही सराफी व्यापाºयांनी बंद यशस्वी केल्याचे सांगण्यात आले.