घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:25 IST2017-08-11T00:25:12+5:302017-08-11T00:25:12+5:30

मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला.

Closer vision | घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तिसरा मृत तरुण हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. बजाजनगरातील मृत तरुण अविनाश गव्हाणे यांच्या पार्थिवावर बजाजनगरात आणि नारायण थोरात याच्या पार्थिवावर गाजगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अविनाशचा विवाह २५ नोव्हेंबरला ठरला होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे बजाजनगरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईहून नाशिकमार्गे औरंगाबादकडे येत असताना येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे ट्रक, मारुती कार व व्हर्ना कार या तिहेरी अपघातात अविनाश गव्हाणे, नारायण थोरात, हर्षल घोलप या तिघांचा मृत्यू झाला. तर गौरव प्रजापती व उमेश भगत हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच बजाजनगरातील या तरुणाचे नातेवाईक व शेकडो कार्यकर्ते घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वाळूज महानगरात शोककळा पसरली. सोशल मीडियामधून या अपघाताच्या माहितीची दिवसभर देवाण-घेवाण सुरू होती.
मराठा मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी वाळूज महानगर परिसरातील अविनाश गव्हाणे (२२, रा. बजाजनगर), नारायण थोरात (रा. गाजगाव), गौरव प्रजापती व उमेश भगत (दोघेही रा. सिडको वाळूज महानगर) असे चौघे जण कारने (क्र. एमएच-२०, ईएफ- ७२६४) बजाजनगरातून अहमदनगरमार्गे मुंबईकडे निघाले होते. या चौघांचा मित्र हर्षल घोलप (रा. संगमनेर) याला त्यांनी पुण्यातून सोबत घेतले होते.
लग्नापूर्वीच काळाने घातला घाला
मृत अविनाश नवनाथ गव्हाणे (२२) याचे कुटुंब मूळचे वेलतुरी (ता.आष्टी जि.बीड) येथील रहिवासी असून, गव्हाणे कुटुंब २५ वर्षांपूर्वी बजाजनगरात आले होते. अविनाशचे आई-वडील बजाजनगरात किराणा दुकान चालवतात. तर अविनाश याने पुणे येथील डी. वाय. महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अविनाशने काही दिवसांपूर्वी मोबाईल कंपनीची डीलरशिप घेतली होती. दोन महिन्यांपूर्वीच अविनाशचा साखरपुडा शेवगाव तालुक्यातील शिकारे नांदूर गावातील तरुणीशी थाटामाटात पार पडला होता. २५ नोव्हेंबर ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच अविनाशवर काळाने घाला घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Web Title: Closer vision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.