बंद घर फोडले; १९ हजारांचा मुद्देमाल लंपास

By Admin | Updated: May 27, 2017 23:11 IST2017-05-27T23:07:03+5:302017-05-27T23:11:05+5:30

लातूर : कन्हैयानगर भागातील दयानंद बिराजदार बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडून १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़

Closed home; Lampas of 19 thousand people | बंद घर फोडले; १९ हजारांचा मुद्देमाल लंपास

बंद घर फोडले; १९ हजारांचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहरातील कन्हैयानगर भागातील दयानंद भिवाजी बिराजदार (३६) हे बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख १० हजार रूपये, असा एकूण १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे़

Web Title: Closed home; Lampas of 19 thousand people