घड्याळाचे दुकान खाक
By Admin | Updated: May 7, 2015 00:58 IST2015-05-07T00:32:43+5:302015-05-07T00:58:16+5:30
बीड : शहरातील कारंजा परिसरात घड्याळाच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी पहाटे घडली.

घड्याळाचे दुकान खाक
बीड : शहरातील कारंजा परिसरात घड्याळाच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी पहाटे घडली.
कारंजा परिसरात नवीद अहेमद गुलाब यांचे नेहा वॉच या नावाने घड्याळाचे दुकान आहे. तेथे विक्री व दुरूस्तीचे काम केले जाते. बुधवारी पहाटे चार वाजता दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. त्यानंतर आगीने संपूर्ण दुकानाला कवेत घेतले. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. विविध कंपन्यांचे विक्री व दुरूस्तीचे घड्याळ, फर्निचर असे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले, असे सांगण्यात आले. दरम्यान शेजारच्या दुकानांना आगीच्या ज्वाला लागल्या मात्र नागरिक धावून गेल्याने मोठे नुकसान टळले. आगीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. शहर ठाण्यात नोंद असून फौजदार डी. व्ही. गित्ते तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)