३५० संचिकांचा अखेर छडा

By Admin | Updated: July 20, 2015 00:54 IST2015-07-20T00:18:47+5:302015-07-20T00:54:23+5:30

बीड : उपविभागीय कार्यालयाच्या जुन्या इमारतीची खिडकी तोडून शासकीय ३५० संचिका शनिवारी चोरीला गेल्याची घटना घडली.

Clip to 350 files | ३५० संचिकांचा अखेर छडा

३५० संचिकांचा अखेर छडा

!
बीड : उपविभागीय कार्यालयाच्या जुन्या इमारतीची खिडकी तोडून शासकीय ३५० संचिका शनिवारी चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत विजया लोंढे, लंकाबाई खतांगळे या भंगार गोळा करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १८, १९ जुलै रोजी सुटी असल्याने उपविभागीय कार्यालयात कोणीच नव्हते. याचा फायदा घेऊन भंगार वेचणाऱ्या विजया व लंकाबाई यांनी कार्यालयाची खिडकी तोडून खोलीतील ३५० संचिका चोरल्या. शहरातील पेठ बीड भागातील शेख आसेफ यांच्या भंगाराच्या दुकानावर नेऊन विकल्या. या दुकानावरील नौकर लहू चांदणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुनील सोळंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुकान मालक शेख आसेफ फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ७९ संचिका व तीन रजिस्टर ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: Clip to 350 files