हवामानातील बदलामुळे आजारांची भीती वाढली

By Admin | Updated: June 9, 2014 00:07 IST2014-06-08T23:31:54+5:302014-06-09T00:07:33+5:30

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घट होत असली तरी दुपारच्यावेळी उन्हाचे जोरदार चटके बसत असल्याने जिवाची काहिली होत आहे़

Climate change leads to fear of illness | हवामानातील बदलामुळे आजारांची भीती वाढली

हवामानातील बदलामुळे आजारांची भीती वाढली

लातूर : गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घट होत असली तरी दुपारच्यावेळी उन्हाचे जोरदार चटके बसत असल्याने जिवाची काहिली होत आहे़ बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असून बालके आणि वयोवृध्दांना विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे़ रविवारी कमाल तापमान ४० अंश सेल्सि़ नोंदले गेले आहे़
गेल्या वर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना अल्प प्रमाणात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या़ परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तापमानाने उच्चांक गाठला़ त्यामुळे जूनच्या सुरुवातीस अबालवृध्दांची होरपळ झाली़ उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे़ मृग नक्षत्रास सुरुवात झाल्याने पाऊस सुरु होऊन आता तापमान कमी होईल अशी आशा नागरिकांना लागली आहे़
यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान १ जून रोजी नोंदले गेले आहे़ या दिवशी कमाल तापमान ४३ अंश सेल्सि़ तर किमान तापमान ३१ अंश़ सेल्सि़ असे होते़ त्यानंतरच्या दोन दिवसांत तापमानाचा पारा उतरून तो ३७़५ अंश सेल्सि़ वर पोहोचला़ ४ जूनपासून पुन्हा पारा चढण्यास सुरुवात झाली़ या दिवशी कमाल ४० किमान २९, ५ जून रोजी कमाल ४२ किमान २९़५ असे होते़ ६ व ७ जून रोजी कमाल तापमान ४०़५ अंश सेल्सि़ असे औराद शहाजनीच्या हवामान केंद्रावर नोंदले गेले आहे़ यंदाच्या मे महिन्यात सर्वाधिक तापमान २५ रोजी ४२़५ अंश सेल्सि़ तर एप्रिलमधील सर्वाधिक तापमान २६ रोजी ४१ अंश सेल्सि़ होते़
गतवर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान २४ मे रोजी ४३ अंश सेल्यि़ होते़ गतवर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक तापमान ३९ अंश सेल्सि़ होते़ त्यानंतर तापमानात घट होत होती़ गेल्या तीन दिवसांपासून तापमान उतरल्याचे दिसत असले तरी उन्हाच्या चटक्यांनी आबालवृध्दांना असह्य केले होते़ त्यामुळे प्रत्येकजण घामाघूम झाल्याचे पहावयास मिळत होते़ हवामानात बदल झाल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम बालके आणि वृध्दांच्या आरोग्यावर होत आहे़ (प्रतिनिधी)
विषाणूजन्य आजाऱ़़
हवामानातील बदलामुळे ताप, सर्दी असे विषाणूजन्य आजार होतात़ हे आजार बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना होतात़ त्यामुळे अबालवृध्दांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी जास्त उन्हात फिरणे टाळावे असे आवाहन लातूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ एम़ बी़ कुलकर्णी यांनी केले आहे़$$्रिपाऊस पडण्याची शक्यता़़़
सध्या सूर्याची वाटचाल कर्कवृत्ताकडे होत आहे़ २१ जून रोजी भारताच्या मध्यभागी लंबरुप किरणे पडतात़ त्यामुळे प्रखर उष्णता जाणवत आहे़ उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते, असे हवामानशास्त्र अभ्यासक प्रा़ डॉ़ सुरेश फुले यांनी सांगितले़

Web Title: Climate change leads to fear of illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.