शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 16, 2016 23:54 IST

हदगाव : मीटर नाही तरीही वीजबिल चालू असा प्रकार हदगाव तालुक्यात जोरात सुरू आहे. तालुक्यातील हजारो ग्राहकांनी अनामत रक्कम भरुनही मागील दोन-दोन वर्षांपासून त्यांना वीज मीटर मिळाले नाही

हदगाव : मीटर नाही तरीही वीजबिल चालू असा प्रकार हदगाव तालुक्यात जोरात सुरू आहे. तालुक्यातील हजारो ग्राहकांनी अनामत रक्कम भरुनही मागील दोन-दोन वर्षांपासून त्यांना वीज मीटर मिळाले नाही. एकूणच या सर्व प्रकारामुळे ग्राहकांची धावपळ सुरू आहे.मनाठा येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून ४० गावांचा कारभार याअंतर्गत चालतो. त्यासाठी एक कनिष्ठ अभियंता, एक लाईनमन व सहा सहाय्यक लाईनमन आहेत. गावची लोकसंख्या सात हजारांच्या आसपास आहे. काहींना घरकुले मिळाली तर काहींनी प्लॉट घेवून घरे बांधली. नवीन घरमालक व विभक्त कुटुंबांना विद्युत मीटरची आवश्यकता असल्याने अनेकांनी नवीन जोडणीसाठी अर्ज दाखल केले. पूर्वी एकाच मीटरवरुन अनेकांना वीज जोडणी दिली जात होती. हा प्रकार महावितरणने बंद केला. आता एका कुटुंबाला एक विद्युत मीटर अनिवार्य केल्याने अनेकांना मीटर घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ग्राहक वाढले. अनेकांनी वीज मीटरसाठी कोटेशन भरले. मात्र मीटर मिळाले नाही. अनेक ग्राहकांना मीटर नसतानाही सरासरी बिले मात्र सुरू झाले आहेत. कित्येकांनी बिलेही भरली. मात्र भोकरच्या भरारीच्या पथकाने कारवाई केल्याचे कळताच अनेकांमध्ये घबराहट पसरली. अशी जवळपास १४० ग्राहक एकट्या मनाठा गावात निघाली आहेत. प्रत्येक गावात ही संख्या आहे. वीजचोरीवर आळा घालण्यासाठी नियमित ग्राहकांना अवरेज बिल द्यायचे व दुसरीकडे चोरी करण्यासाठी ग्राहकांना उत्तेजन द्यायचे असा वीज मंडळाचा कारभार सुरू आहे. वीज मीटर नसतानाही वीज बिले दिली जातात. मग दीड हजार रुपये वीज मीटरसाठी भरायचे कशासाठी? असा सवाल आहे. एका ग्राहकाकडून जवळपास ३५०० रुपये घेतली जातात. वीज मीटरचे कंत्राट एका कंपनीकडे आहे. मागणी केल्यानुसार ते पुरवठा करतात. त्यामुळे ग्राहक जास्त व मीटर कमी असा प्रकार होत असल्याचे कर्मचारी खाजगीत बोलताना सांगतात. यासंदर्भात अभियंता बोंगाडे म्हणाले, अशा ग्राहकांना आमच्याकडे पाठवा, त्यांना नियमित करुन घेण्यात येईल. (वार्ताहर)