मनपा उपायुक्तासह लिपिक चतुर्भुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:18 IST2017-10-27T01:18:31+5:302017-10-27T01:18:42+5:30

लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लिपिकामार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाच्या उपायुक्तांसह लिपिकाला रंगेहाथ पकडले.

Clerk arrested with Municipal Deputy Commissioner | मनपा उपायुक्तासह लिपिक चतुर्भुज

मनपा उपायुक्तासह लिपिक चतुर्भुज

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तक्रारदार यांना सेवेत कायम करण्यासंबंधीची फाइल पहिल्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यासाठी तीन लाखांची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लिपिकामार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाच्या उपायुक्तांसह लिपिकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई महानगरपालिकेत २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
उपायुक्त अय्युब खान नूर खान पठाण (५७) आणि वरिष्ठ लिपिक दादाराव रखमाजी लाहोटी (५४) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Web Title: Clerk arrested with Municipal Deputy Commissioner