शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई तहसीलमध्ये लाच घेताना लिपिकचतुर्भुज

By admin | Updated: August 9, 2015 00:31 IST

गेवराई : तालुक्यातील चकलांबा येथील शेतामधून बैलगाडीसाठी मार्ग काढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तहसील कार्यालयातील

गेवराई : तालुक्यातील चकलांबा येथील शेतामधून बैलगाडीसाठी मार्ग काढण्यासाठी एका शेतकऱ्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेवराई तहसील कार्यालयातील एका लिपिकास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी मोठ्या शिताफीने पकडले.नरेंद्र रमेशराव रूपदे असे त्या लिपिकाचे नाव आहे. तो गेवराई येथील तहसील कार्यालयात कार्यरत आहे. तक्रारदार याचे चकलांबा येथील गट नंबर ४६० मध्ये शेती असून, शेतामध्ये जाण्यासाठी पूर्वी नदीमार्गे रस्ता होता. परंतु सध्या सदरच्या नदीवर जलसंधारण योजनेमार्फत सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी झाल्याने शेताकडे जाण्यासाठी मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे तक्रारदाराने २१ जुलै रोजी गेवराईच्या तहसील कार्यालयात बैलगाडी मार्ग खुला करण्यासाठी अर्ज दिला होता.दरम्यान, ७ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालय येथे तक्रारदार गेले असता शेतामध्ये बैलगाडीमार्ग पाहिजे असेल तर ११ हजार रूपये द्यावे लागतील, असे लिपीक नरेंद्र रूपदे यांनी सांगितले. ही शासकीय केस आहे काय ? पैसे दिल्याशिवाय पुढे कारवाई होणार नाही असे रूपदे यांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. त्यावरून शनिवारी पंचासमक्ष मागणीची पडताळणी केली असता लोकसेवक रूपदे यांनी तडजोडीअंती सहा हजार रूपये स्वीकारणे मान्य केले. ही रक्कम स्वीकारताना लिपीक रूपदे यांना शनिवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले.गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजय लोहकरे, पो. नि. गोंदकर, वाघ यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)