श्री विसर्जनाच्या तोंडावर विहिरींची स्वच्छता
By Admin | Updated: September 6, 2014 00:42 IST2014-09-06T00:34:24+5:302014-09-06T00:42:38+5:30
औरंगाबाद : जि. प. मैदानावरील सार्वजनिक श्री विसर्जन विहिरींच्या साफसफाईला पालिकेने उशीर केल्यामुळे सात दिवसांचे गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांना एन-१२ येथील विहिरीकडे जावे लागले.

श्री विसर्जनाच्या तोंडावर विहिरींची स्वच्छता
औरंगाबाद : जि. प. मैदानावरील सार्वजनिक श्री विसर्जन विहिरींच्या साफसफाईला पालिकेने उशीर केल्यामुळे सात दिवसांचे गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांना एन-१२ येथील विहिरीकडे जावे लागले. काही प्रतिष्ठाने आणि स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील भक्त श्री विसर्जनासाठी आले होते. मात्र, विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. तसेच विहिरीत पाणीही नव्हते. त्यामुळे त्यांना लांबवर विसर्जनासाठी जावे लागले. सात दिवसांचे किती गणेशांचे विसर्जन काही भक्त करतात. त्यामुळे सर्व विहिरी तयार असल्या पाहिजेत. मात्र, पालिकेने यंदा विहिरीतील गाळ काढण्याचे काम उशिरा सुरू केले. उपअभियंता फड म्हणाले, जि. प. मैदानावरील विहीर सफाईचे काम सुरू आहे. त्या विहिरीत पाणी आणून टाकावे लागते. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह एन-१२ येथे आहे. त्यामुळे गणेश भक्तांना तिकडे जाण्यास सांगितले. दरम्यान, विहिरींच्या स्वच्छतेचा आढावा आज आयुक्त पी. एम. महाजन यांनी घेतला. दोन वर्षांपूर्वी मुकुंदवाडीतील विसर्जन विहिरीत गाळ काढताना आॅक्सिजन न मिळाल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर मनपा दरवर्षी काळजी घेत आहे.