घृष्णेश्वर संस्थानलाही आकारला स्वच्छता कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:26 IST2017-10-03T00:26:01+5:302017-10-03T00:26:01+5:30
वेरूळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक आणि देश- विदेशातून पर्यटक येतात; परंतु येथील अस्वच्छता पाहून आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात कोणते चित्र निर्माण होत असेल. यापुढे थोडीही अस्वच्छता अथवा रस्त्याच्या कडेला घाण दिसता कामा नये. दैनंदिन स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच आणि सदस्यांना दिले.

घृष्णेश्वर संस्थानलाही आकारला स्वच्छता कर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वेरूळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक आणि देश- विदेशातून पर्यटक येतात; परंतु येथील अस्वच्छता पाहून आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात कोणते चित्र निर्माण होत असेल. यापुढे थोडीही अस्वच्छता अथवा रस्त्याच्या कडेला घाण दिसता कामा नये.
दैनंदिन स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच आणि सदस्यांना दिले.
१५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या विशेष अभियानाचा समारोप आज २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी झाला. यानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळंके, स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राम लाहोटी आदींनी वेरूळ येथे भेट दिली. तेथे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पुरातत्व विभागाचे अधिकारी, घृष्णेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी, व्यापारी, पोलीस अधिकारी आणि दुकानदारांसोबत त्यांनी संवाद साधला.
दैनंदिन स्वच्छता का होत नाही, याबद्दल माहिती जाणून घेतली. तेव्हा जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला दैनंदिन स्वच्छतेसाठी जिल्हा ग्रामनिधीतून एक ट्रॅक्टर व ट्रॉली देण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी दिले. याशिवाय ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी मनुष्यबळ आणि अन्य खर्चाकरिता घृष्णेश्वर मंदिर संस्थानने दरमहा ७ हजार रुपये, मोठ्या व्यापाºयांनी २०० रुपये आणि दुकानदारांनी १०० रुपये देण्याच्या सूचना केल्या. त्या सर्वांनी मान्यही केल्या.
वेरूळ येथे येणारे भाविक व पर्यटकांसाठी सुलभ शौचालय उभारण्याचा निर्णयही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. त्यासाठी घृष्णेश्वर मंदिर संस्थानकडून जागा देण्याचे मान्य केले.
लवकरच यासाठी एखाद्या संस्थेसोबत करार करून तेथे सुलभ शौचालय सुरू केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सांगितले.