जुन्या इमारतीत साफसफाई
By Admin | Updated: September 12, 2014 00:30 IST2014-09-12T00:21:54+5:302014-09-12T00:30:51+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत जागोजागी पडून असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमुळे या ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र दिसून येत होते.

जुन्या इमारतीत साफसफाई
औरंगाबाद : रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीत जागोजागी पडून असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमुळे या ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे चित्र दिसून येत होते. याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच स्थानिक रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. जुन्या इमारतीत गुरुवारी जागेची साफसफाई क रून मद्याच्या रिकाम्या बाटल्या हटविण्यात आल्या.
मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावारूपास येत असलेल्या रेल्वेस्थानकाच्या जुन्या इमारतीमधील विश्रामगृहाचा वरील मजला आणि पायऱ्यांवर ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडून होता. याशिवाय जिन्यावरही ठिकठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडून असल्याचे दिसत असताना रेल्वेस्थानकाच्या या जुन्या इमारतीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत होते; परंतु याविषयी वृत्त प्रकाशित करताच कुंभकर्णी झोपेतून प्रशासन जागे झाले.
या ठिकाणी गुरुवारी साफसफाई करून मद्याच्या रिकाम्या बाटल्या हटविण्यात आल्या. पुन्हा या ठिकाणी असा प्रकार घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. या ठिकाणी कोणीही सहज ये-जा करीत आहे. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.