प्रवाशांना दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:10 IST2017-08-21T00:10:09+5:302017-08-21T00:10:09+5:30
प्रवास करताना रेल्वे स्टेशनचा परिसर व रेल्वे डब्यात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा स्वच्छतेचा संदेश रेल्वे कर्मचारी व रेल्वे मिक्सड् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिला.

प्रवाशांना दिला स्वच्छतेचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : प्रवास करताना रेल्वे स्टेशनचा परिसर व रेल्वे डब्यात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा स्वच्छतेचा संदेश रेल्वे कर्मचारी व रेल्वे मिक्सड् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना दिला.
नांदेड विभागाच्या वतीने १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृती अभियानांतर्गत पूर्णा रेल्वेस्थावकावर स्वच्छ रेल्वे अभियान राबविण्यात येत आहे. रेल्वे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पूर्णा रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच तपोवन एक्सप्रेस, पुशपूल, सचखंड एक्सप्रेस इ. रेल्वेगाड्यातील प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. प्रवासा दरम्यान प्रवाशांनी स्वच्छता राखण्यासाठी काय करावे, या विषयीही मार्गदर्शन केले. तसेच रेल्वे डबा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, सकाळपासून रेल्वेस्थानकावरील सर्व परिसर स्वच्छ केला. यामध्ये नांदेड विभागाचे वरिष्ठ डीएमई जी. अप्पाराव, मजदूर युनियनचे अशोक कांबळे, मुख्य यातायत निरीक्षक शेख अहमद, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार, जिलानी पाशा, मुख्याध्यापक अशोक तवर, डॉ.हाशीम, नागराज नाईक, चंदनकुमार, संजयकुमार कसवाह, एन.एस. पंचांगे, के.एल. गुर्जर, जे.सदरलाल, ए.जी. धबाले, अब्दुल मस्तान, शशिकांत धोपे, एस.बी. तांदुळे, कोमल जोंधळे, मंजुषा जाधव, शेख जावेद आदी कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला.