महिनाभर मनपाचे स्वच्छता अभियान

By Admin | Updated: December 30, 2014 01:18 IST2014-12-30T00:57:27+5:302014-12-30T01:18:21+5:30

औरंगाबाद : महापालिका ३१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या काळात स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे आज महापौर कला ओझा यांनी सांगितले

Cleanliness drive for a month | महिनाभर मनपाचे स्वच्छता अभियान

महिनाभर मनपाचे स्वच्छता अभियान


औरंगाबाद : महापालिका ३१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या काळात स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे आज महापौर कला ओझा यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभाग अधिकारी व घनकचरा विभागप्रमुख डी.डी.सूर्यवंशी यांना याप्रकरणी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले. बैठकीला सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, गिरजाराम हाळनोर, प्रफुल्ल मालानी, सूर्यकांत जायभाये, वीरभद्र गादगे यांची उपस्थिती होती.
३१ रोजी सकाळी ७ वा. गजानन महाराज मंदिर येथून अभियानाला प्रारंभ होईल. प्रत्येक नगरसेवक वॉर्डामध्ये लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवतील. खा.खैरे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन होणार आहे. नगरसेवक व नागरिकांना पालिका अभियान राबविण्यासाठी आवाहन करणार आहे.
अभियानासाठी लागणारे झाडू, टोपले, फावडे, कार्बाेलिक पावडर, सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागणारी संरक्षण साहित्याची मागणी प्रभाग अधिकाऱ्यांनी केली. मनपाच्या भांडारात साधनसाम्रगीचा तुटवडा आहे. त्यामुळे मोहीम आहे त्या साधनांच्या आधारे राबवावी लागेल.

Web Title: Cleanliness drive for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.